Maharashtra political crisis : 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी पुन्हा ‘तारीख पे तारीख’

Update: 2023-07-14 07:13 GMT

16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी टिपण्णी केली.

16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतल्याने ठाकरे गटाचे नेते सुनिल प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आम्ही यासंदर्भात नोटीस पाठवू. तसेच दोन आठवड्यानंतर याविषयी पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

वर्षभरापासून सुरु असलेल्या प्रकरणाचा निकाल 11 मे 2023 रोजी देण्यात आला. त्यानुसार 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर दोन महिने झाले तरी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना त्यांना नोटीस पाठवून पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर घेणार असल्याचे म्हटले आहे.

राहुल नार्वेकर यांच्याकडून कारवाईला सुरुवात

विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन्ही गटांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आठवडाभरात दोन्ही गटांनी आपलं उत्तर देण्यात यावं, असं मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. त्याबरोबरच ठाकरे गटाची घटना तपासून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News