शरद पवार असं का वागतात?

Update: 2020-09-24 10:09 GMT

राजकारणातील चाणक्य अशी उपाधी शरद पवारांना नेहमीच दिली जाते. मात्र, शरद पवारांच्या भुमिकेवर नेहमीच माध्यमांवर चर्चा होत असते. शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकाबाबत दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज संसदेत बोलताना ‘शरद पवार, शरद पवार की भुमिका नही, बल्की ललिता पवार की भूमिका निभा रहे है…!’ असं म्हणत पवारांच्या भूमिकेवर कोटी केली होती.

नुकतंच राज्यसभेत कृषि विधेयक पारित करण्यात आलं. यावेळी राज्यसभेत अनुपस्थित राहत राष्ट्रवादीने अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला मदत केल्याचा आरोप आता केला जात आहे. विशेष बाब म्हणजे कलम 370 च्या वेळेस देखील राज्यसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अनुपस्थित होता. मात्र, खरंच शरद पवारांच्या भुमिकेबाबत वारंवार चर्चा का होते? नेहमी गोल गोल विधानं करुन चर्चेत राहणाऱे शरद पवार ठाम भूमिका घेताना का दिसत नाहीत?

स्वत:च्या पक्षाचं सरकारपाडून स्वत: मुख्यमंत्री होणं असो, तर कधी भाजपसोबत युती, कधी राजीव गांधींसमोर शरणागती तर कधी सोनियांच्या विरोधात बंडाची पुडी, कधी सोनियांशी लाडीगोडी; तर कधी मोदींशी समझोता, कधी राजसोबत मैत्रीचा देखावा; तर कधी गुजरात निवडणुकीत मोदी-शहांशी मैत्री, तर कधी डायरेक्ट महाराष्ट्रात उद्धव यांच्यावर प्रेमाची छत्री यामुळे पवारांच्या महत्त्वाच्या वेळी ठाम भुमिका का नसतात? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

या संदर्भात आम्ही राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांची मत जाणून घेतली. पाहा काय आहेत. तज्ञाचं मत...?

Full View

Similar News