डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन... इतकी वर्ष झाली लाखोच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी कुठल्याही व्यवस्थेविना स्वः खर्चातून दादर चैत्यभूमी परिसरात येत असतात. खेड्या-पाड्यातून लोकं इतक्या मोठ्या संख्येनं लोकं येतात का कशासाठी ? हा विचार कुणी केलाय का ? ४ डिसेंबरपासूनचं दादर चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसर भीम अनुयायांनी गजबजलेला असतो. शांततापूर्वक लोक येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आप-आपल्या गावी निघून जातात. परंतु या गर्दीचं महत्त्व मुख्य प्रवाहातल्या माध्यमांना इतकी वर्ष का कळलं नसावं? की या गर्दीला जाणून-बुजून दुर्लक्षित ठेवलं गेलं? माध्यमांची आणि राजकीय नेत्यांची मानसिकता काय आहे. तसेच आंबेडकरी अनुयायी सर्वार्थानं कसे सक्षम होत आहे यावर मॅक्स महाराष्ट्रचे संस्थापक रविंद्र आंबेकर यांचे विश्लेषण पाहा आणि विचार करा..