ट्रोलच्या धाडीचं बुमरॅग झालंय का?

Update: 2020-05-06 00:49 GMT

अलिकडे ट्रोल हा शब्द तुमच्या कानावर वारंवार पडत असेल. तसं आपल्याकडं ट्रोलिंग 2014 लाच सुरु झालं. मात्र, हा काय प्रकार आहे. हे त्यावेळी बहुतेक लोकांना समजलं देखील नाही. तो काळ मोदी सरकार सत्तेत येण्याचा काळ होता. तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे चित्रविचित्र फोटो पाहिले असतील.

आय एम अ ट्रोल या पुस्तकाच्या माध्यमातून स्वाती चतुर्वेदी यांनी ट्रोल म्हणजे काय हे देशासमोर आणलं. या पुस्तकाचा मराठी अनुवाद मुग्धा कर्णिक यांनी केला आहे. हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे. सुरुवातीला तुम्ही ट्रोलिंग मध्ये अत्यंत घाणेरड्या शब्दात राहुल गांधी यांना शिव्या घातलेManmohan Singhल्या पाहायल्या असतील. हो यालाच ट्रोल म्हणतात.

आत्तापर्यंत या ट्रोल च्य़ा धाडी भाजप वगळता सर्व पक्षावर पडताना पाहायला मिळत होत्या. मात्र, याता या ट्रोल च्या धाडीचं बमुरॅग झालं आहे. आता भाजपचे नेते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. नक्की काय आहे ट्रोलिंग? जाणून घ्या डॉक्टर अमोल देवळेकर यांच्याकडून

Full View

Similar News