सोन्याचे भाव 82 हजारांवर जाऊ शकतात का?

Update: 2020-07-27 06:36 GMT

सोन्याचे भाव वाढण्याचे मुख्य कारण काय? कोरोनाचा सोन्याच्या भावावर परिणाम झाला आहे का? जागतिक मंदी, युद्धजन्य़ परिस्थिती, वाढत्या तेलाच्या किंमती मध्ये निर्माण होणारी तेजी मंदी यामुळं सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच विशेष बाब म्हणजे काही तज्ञ सोन्याचे भाव 82 हजारांवर जातील असा अंदाज व्यक्त करत आहेत. मात्र, खरंच असं होऊ शकतं का? जळगाव येथील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी स्वरुप कुमार लुंकड यांच्याशी आम्ही बातचित केली असता, त्यांनी सोन्याची गुंतवणूक करताना नक्की कोणती काळजी घ्यावी?

खरंच सोन्याचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात का? याचं विश्लेषण केलं. तसंच अमेरिकन बॅंकांनी व्याजात केलेल्या कपातीमुळे देशातील सोन्याच्या दरांवर देखील परिणाम झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. पाहा काय म्हणाले स्वरुप कुमार लुंकड...

Similar News