Savitribai Phule's Poetry : ‘शूद्रांचे दुखणे’ या कवितेत शिक्षणाचा मार्ग महत्त्वाचा का सांगताहेत सावित्रीमाई

Update: 2026-01-02 14:46 GMT

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्री वदते या कविता मालिकेतून सामाजिक वास्तव मांडणारी ‘शूद्रांचे दुखणे’ या सावित्रीमाईंच्या कवितेचे सुंदर सादरीकरण केलंय स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या प्रतीक्षा बांगर यांनी...

शूद्रांचे दुखणे 

दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले

ब्रम्हविहित सेवेचे भू-देवांनी पछाडले

अवस्था पाहुनि त्यांची होय शब्दी मन उठे

सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुध्दी अटे

शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा

शिक्षणाने मनुष्यत्व पशूत्व हाटते पहा

Full View

Similar News