साठीचा महाराष्ट्र आणि प्रशासकीय व्यवस्था

Update: 2020-05-01 15:07 GMT

आज महाराष्ट्र राज्याला ६० वर्ष पूर्ण झाले आहेत. या साठ वर्षांत महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था सुदृढ असून देशामध्ये महाराष्ट्र राज्याचा सकल उत्पादकात पहिला क्रमांक लागतो. परंतु आपला दरडोई उत्पन्न बाकी राज्यांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था गेल्या साठ वर्षात नेमकी कशी आहे. येणाऱ्या काळात प्रशासकीय व्यवस्थेनं काय केलं पाहिजे. राज्याच्या नागरिकरणाचे धोरण नेमकं काय आहे.

कायद्याची सुदृढता चांगली जरी असली तरी काही कायदे सुधारण्याची गरज आहे. राज्यात जमीन मालकी हक्काचा कायदा नाही. हा कायदा अद्यापही प्रलंबित असून गेल्या साठ वर्षातलं हे अपशय आहे. तसेच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी नेमकी कुठली पावलं उचलली पाहिजे.

महामारी आणि आपत्तीची परिस्थिती आल्यास प्रशाकीय नेतृत्वाने कशी तयारी करायला हवी. भविष्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय नेतृत्वाने कशी तयारी करायला हवी. एकंदरित महाराष्ट्राची प्रगती कशी होईल कुठलीही आव्हानं राज्यासमोर आहेत. सांगतायेत माजी आयएएस अधिकारी महेश झगडे... पाहा हा व्हिडिओ...

Full View

Similar News