विद्रोही कवी सावित्रीमाई : धोंडे मुले देती ‖ नवसा पावती, लग्न का करती ‖ नारी नर
"नवस" या कवितेतून थेट प्रथा, परंपरा आणि अंधश्रद्धा बाळगणाऱ्या व्यवस्थेलाच सावित्रीमाई सवाल करतात... त्याकाळातील या निर्भीडपणामुळए त्यांच्यातील विद्रोही कवीची छवी पाहायला मिळते... काय आहे कवितेचे बोल पाहा, ऐका आणि वाचा
Savitribai Phule's Poetry सावित्री वदते या कविता मालिकेत सावित्रीबाई फुले यांची नवस ही कविता आजही समाजाला तंतोतंत लागू पडते. या कवितेतील मांडणी आजही आपल्या अवतीभवती पाहायाला मिळते. नवस केल्यानं आम्हाला बाळ झालं या भ्रामकतेत आजही आपला समाज अडकून पडला आहे. Superstitionया भ्रमाची चिरफाड आपल्या लेखनीतून सावित्रीमाई करतात तेव्हा त्यांच्यातील विद्रोही साहित्यिक कवी आपल्या दिसते.
गोट्याला शेंदूर ‖ फासुनी तेलात ‖
वसती देवात ‖ दगड तो ‖‖
म्हसोबा खेसोबा ‖ भयंकर देव
तयावर भाव ‖ ठेवूनिया ‖
नवस करती ‖ बकरु मारीन ‖
नवस फेडीन ‖ बाळ जन्मी ‖
धोंडे मुले देती ‖ नवसा पावती
लग्न का करती ‖ नारी नर ‖‖
या कवितेतून विज्ञाननिष्ठ वैचारिक मांडणी करताना परंपरागत प्रथा आणि अंधश्रद्धा व्यवस्थेला प्रश्नच विचारला गेला आहे पुढे संत गाडगेबाबा हाच विचार त्यांच्या भजनातून मांडताना दिसतात. देवाला दगड म्हण्याचे धाडस अगदी पीएचडी घेतलेला व्यक्ती आज भारतीय लोकशाही व अनेक हक्क असताना मांडू शकत नाही. मग त्या काळात या कवितेतील रचनेनं किती धुरळा उडवला Social Reform असेल याची कल्पनाच सावित्रीबाई फुले यांच्या निर्भीड पणाला सलाम करते.