अनधिकृत बाईक-टॅक्सी विरोधात रिक्षा चालक आक्रमक

Update: 2022-11-29 11:29 GMT

 'अनधिकृत बाईक टॅक्सी बंद करा ' या मागणीसाठी पुणे शहरातील आरटीओ कार्यालयावर पुण्यासह राज्यभरातील रिक्षा चालकांनी धडक मोर्चा काढला. पण रिक्षा चालकांनी ही मागणी का केली आहे? या अनधिकृत टॅक्सी आणि बाईकमुळे रिक्षाचालकांवर काय परिणाम होत आहे? हे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी जाणून घेतले आहे.

अनधिकृत टॅक्सी आणि बाईकमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आधी दिवसाला हजार रुपये मिळायचे मात्र आता तीनशे रुपये सुद्धा घरी नेता येत नाहीत. त्यातच मुलांचे शिक्षण, रिक्षाचे हप्ते भरता येत नाहीत. त्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे, अशी भावना रिक्षा चालकांनी व्यक्त केली आहे.

बाईक टॅक्सीला अधिकृत परवानगी नाही तरीसुद्धा अनेक अनधिकृत बाईक टॅक्सी अस्तित्वात आहेत. यामुळे आमच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने यावर कठोर निर्णय घ्यायला हवा. या संदर्भात आम्ही वारंवार RTO कार्यालयाला विनंती केली. तरी सुद्धा आम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळाला नसल्याच रिक्षा चालक सांगत आहेत.

या आंदोलनात हजारो रिक्षा चालक सहभागी झाले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच ठेवणार असल्याचं सांगितलं जात आहे. या आंदोलनामध्ये महिला रिक्षाचालकांचाही मोठा सहभाग आहे.


Full View

Tags:    

Similar News