अंध व्यक्तीवर उपासमारीची वेळ

Update: 2020-05-26 11:19 GMT

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 23 मार्चपासुन लॉकडाऊन करण्यात आला. सर्व उद्योग धंदे, दुकान जवळ जवळ बंद झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील अंध असलेल्या व्यक्तीच्या जीवनात पुर्णपणे अंधार झाला आहे. आज त्यांना उपासमारीची वेळ आली आहे.

अहमदनगर शहरातील कोठला येथे राहणारे अस्लम पठाण हे अंध असून उदरनिर्वाहासाठी गेल्या दहा वर्षापासुन अहमदनगर रेल्वे स्टेशन वर चिक्की विकण्याचा व्यावसाय करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून रेल्वे बंद असल्यानं व्यवसाय देखील बंद आहे. घरी दोन मुली आई आणि बायको आहे. व्यवसायातुन रोज 200 ते 300 रूपये मिळत असत. यावर त्यांचे कुटूंब चालत होते. मात्र, रेल्वे बंद झाल्याने ते उत्पन्न देखील बंद झाले आहे. अस्लम यांच्यावर कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

अंध दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य सरकारने अनेक योजना केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अस्लम सारख्या सारख्या असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

यासंदर्भात अहमदनगर चे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विचारना केली असता, त्यांनी नावे द्या लगेच अनुदान देण्याचे आदेश देतो असं मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं. मात्र, सरकार दरबारी सर्व व्यक्तींची नाव पहिल्यादांच गेलेली असतात. जिल्हा आरोग्य अधिकारी जेव्हा दिव्यांगांना दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट देतात. तेव्हा कोण व्यक्ती किती प्रमाणात दिव्यांग आहे. हे नमुद केलं जातं. त्यामुळं ही यादी घेऊन या दिव्यांगाना तात्काळ मदत केली जाऊ शकते.

 

Full View

Similar News