सावधान! देशाची बॅकींग व्यवस्था धोक्यात: विश्वास उटगी...

Update: 2020-08-02 06:28 GMT

भारतात लॉकडाऊन सुरु होऊन 4 महिने पूर्ण झाले आहेत. आता अनलॉक 1 आणि अनलॉक 2 पूर्ण झाले आहेत. मात्र, या काळात केंद्र सरकारने 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजचं पुढं काय झालं? या पॅकेजच्या अंतर्गत कर्ज घेतलेल्या लोकांना 6 महिने हप्ते भरण्यास सवलत दिली होती. मात्र, ही सवलत नक्की काय आहे?

सहा महिने बॅंकाचे EMI या सवलतीमुळे 50% हून अधिक कर्ज बुडीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॅंका तोटयात जाण्याची भीती आहे. बॅंका तोटयात जाण्याची भीती मोठी आहे. म्हणून सरकार या बॅकाचं खाजगीकरण किंवा सरळ सरळ विक्री करु शकतं. हे एक कारस्थान नाही काय ?

अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्यानं ते कर्ज भरु शकणार नाहीत. अशा परिस्थितीत देशावर मोठं आर्थिक संकट कोसळण्याची भीती बॅकींग तज्ञ विश्वास उटगी यांनी व्यक्त केलं आहे.

Similar News