लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स

Update: 2020-04-26 15:32 GMT

करोना विषाणूमुळे देश ल़ॉकडाऊन होऊन १ महिना झाला आहे. सध्या करोना महामारीवर कोणतेही औषध, लस उपलब्ध नाही. लॉकडाऊनमुळे करोना विषाणू मरणार नाही परंतु वेग नक्कीचं मंदावेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनासंदर्भात अजब-गजब विधानं केली असून त्यांची ही विधानं मूर्ख आणि धोकादायक असल्याचे जगातील वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. तसेच भारतात ICMR च्या अहवालानुसार लॉकडाऊन जाहीर करण्याआधी आपल्याकडे वैद्यकीय सुविधांची माहिती घेणं आवश्यक होतं, त्यानुसार लॉकडाऊन जाहीर करायचा होता मात्र पूर्वनियोजन न करताच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तसेच लॉकडाऊनमुळे कौंटुबिक हिंसाचार वाढतोय, स्त्रियांवर अत्याचार होत आहे.

अमेरिकेत यासाठी लोकं स्वसंरक्षणासाठी बंदुकांची खरेदी करतायेत. या दिवसांत एकाकीपणा, नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाणही वाढले आहेत. जगातील डॉक्टरांसमोर करोनाचे संकट असताना आता मानसिक विकाराच्या रुग्णांचे ही आव्हान आहे. लॉकडाऊननंतर कदाचित आर्थिक परिस्थिती सुधारेल मात्र मानसिक स्थिती कशी सुधारणार... एकंदरितचं लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स सांगतायेत काँग्रेस खासदार कुमार केतकर.. पाहा हा व्हिडिओ..

Full View

Similar News