विधान परिषद निवडणूक: महाविकास आघाडी विरोधात बच्चू कडूंचा उमेदवार

महाविकास आघाडीत मंत्री पदी असलेल्या बच्चू कडू यांचा महाविकास आघाडी विरोधात आक्रमक पवित्रा, राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या उमेदवारा विरोधात दिला उमेदावर... पाहा काय म्हणाले बच्चू कडू

Update: 2020-11-12 05:15 GMT

औरंगाबाद: भाजपमध्ये पदवीधर निवडणुकीवरून बंडखोरी सुरू असतानाच महाविकास आघाडीत सुद्धा काही All is Well नसल्याचं चित्र आहे. कारण महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असणाऱ्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुद्धा आपल्या पक्षाचा उमेदवार मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.

पदवीधर निवडणुकीत मराठवाडा मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यामुळे सोबत असलेल्या इतर पक्षाने उमेदवार उभा करणे अपेक्षित नाही. मात्र, असे असतानाही बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून सचिन ढवळे यांना उमेदवारी दिली असून, याची घोषणा त्यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली.

भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यानंतरही भाजप नेते प्रवीण घुगे, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षातील बंडखोरी समोर आली आहे. त्यातच आता महाविकास आघाडीत सुद्धा बंडखोरी पाहायला मिळत आहे. तर यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, उमेदवारी बाबत महाविकास आघाडीत आमचं असे काही आधी बोलणं झालं नव्हतं. तसेच आमचा उमेदवारच निवडून येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले बच्चू कडू


Full View
Tags:    

Similar News