मंदिर प्रवेश आंदोलनापेक्षा PM : CM फंड कुठे खर्च करता ते विचारा ?

Update: 2020-08-30 15:29 GMT

दिवसेंदिवस Covid विषाणू आपले हात - पाय पसरत असताना राजकीय पुढाऱ्यांनी धार्मिक स्थळ सुरु करण्याचा अट्टाहास करत सरकारविरोधात आंदोलनं करत आहेत. सध्या देवांचे अवतार असलेल्या डॉक्टर,नर्स, पालिका कर्मचारी यांना काय हवं नको? ते बघण्याचे सोडून मंदिरं (temple) खुली करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर वर्षानुवर्ष पंढरपूर वारीचं कव्हरेज करणारे आणि वारीचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना सांगितले की, माझ्या मते करोनाकाळात धार्मिक स्थळे सुरु करणे म्हणजे आरोग्याशी खेळणे होईल, भक्ती, आस्था, श्रद्धा सगळं जरी बरोबर असलं तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे घातक आहे.

करोनाच्या या परिस्थितीत सरकारने जे नियम दिले आहेत. ते म्हणजे फिजीकल डिस्टसिंग पाळूनही विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. मुखदर्शन हा उत्तम पर्याय आहे. वारकऱ्यांना मंदिरांचा कळस जरी दिसला तरी त्यांना विठ्ठलाचे दर्शन घेतल्यासारखे वाटते. सध्या करोनाच्या (corona) रुग्णांची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा फंड (CM fund) कुठे खर्च केला जातो? पीएम फंड (PM fund) कोऱोना रुग्णांसाठी वापरला जातोय का? यावर बोललं पाहिजे. आंदोलन केलं पाहिजे. आपण हे सोडून मंदिर खुली करण्याचा अट्टाहास करुन आंदोलन करावीत. हे विठ्ठलाच्या खऱ्या भक्तांनाही वाटणार नाही आणि खुद्द देवालाही वाटणार नाही. आणि म्हणून माणसांनी माणसांचा विचार करायला हवा आणि करोनाच्या संकटावर मात केली पाहिजे.

असं मत डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे.

Full View

Similar News