२ जी घोटाळा: ए. राजा, कनिमोळीसह सर्व आरोपी निर्दोष

Update: 2017-12-21 07:14 GMT

१.७६ लाख कोटींच्या टू जी घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा, डीएमके नेत्या आणि खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त ठरवलय. घोटाळ्यानंतर सहा वर्षांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिलाय. न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी हा निकाल दिला आहे. सीबीआयला ए. राजा, कनिमोळी यांच्यासह इतर १७ आरोपींवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे त्यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे. इतर निर्दोष मुक्त झालेल्यांमध्ये शाहिद बलवा, विनोद गोयंका, आसिफ बलवा, राजीव अग्रवाल, करीम मोरानी आणि शरद कुमार यांचाही समावेश आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.

‘यूपीए २’ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. यात तब्बल १,७६ लाख कोटी रुपयांचा घोळ करण्यात आला होता. असा निष्कर्ष ‘कॅग’ च्या अहवालामध्ये काढण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.सीबीआय आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे सर्व आरोपींना दोषमुक्त करण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. निकालानंतर डीएमकेच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. अखेर सत्याचाच विजय झाला, अशी घोषणाबाजीही केली.

Similar News