Impact : अखेर पोलीस निलंबित मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश

Update: 2024-02-14 05:07 GMT

हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा सिटी पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि इतर काही पोलिसांनी एका महिलेला अमानुष मारहाण केल्याची घटना मॅक्स महाराष्ट्रने उघडकीस आणली होती. यानंतर पुणे पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महिलेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी एक सहाय्यक पोलिस निरीक्षकासह, दामिनी पथकातील दोन महिला कर्मचाऱ्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर महिला पोलीस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली दमले अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

पोलिसांकडून मारहाण झालेल्या महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने घरकाम करणाऱ्या महिलेवर चोरीचा संशय घेतल्यानंतर हडपसर पोलिसांनी दिनांक 9 फेब्रुवारी ला संबंधित महिलेला मगरपट्टा पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलवले होते. यावेळी महिलेला संबंधित पोलिसांकडून अमानुष मारहाण केल्याचा आरोप पीडित महिलेने पोलिसांवर केला होता. या सर्व घटने संदर्भात मॅक्स महाराष्ट्र ने हे प्रकरण उघडकीस आणले होते. 

Tags:    

Similar News