शेतकऱ्यांची नुकसानभरपाई ही दिवाळी भेट कशी?

Update: 2017-10-18 06:52 GMT

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरूवात होणार आहे. याबाबत ट्विट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे की ही शेतकऱ्यांना दिवाळी भेट आहे.

एका वृत्तपत्रात 'शेतकऱ्यांना दिवाळी भेट' असे शिर्षक देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर ही बातमी रिट्विट करताना शेतकऱ्यांना दिवाळी भेट असे वाक्य वापरले आहे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी, त्यांची नुकसानभरपाई करणारी योजना आहे. कर्जमाफी हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा हक्क आहे. मग हा हक्क देत असताना त्याला दिवाळीची भेट कशी म्हणता येईल असा सवाल उपस्थित केला जात आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांमुळे शेतकरी कर्जबाजारी आहे. शेतकरी कर्जबाजारी होण्यास हे घटक कारणीभूत असताना सरकारकडून दिली जाणारी कर्जमाफी हे भेट कशी असू शकते असा सवाल केला जात आहे.

Similar News