रुपेरी पडद्यावरची आई हरपली, ट्विटरवर ट्रेन्ड

Update: 2017-05-18 04:34 GMT

अभिनेत्री रिमा लागू यांच मुंबईत हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ५९ वर्षांच्या होत्या. बुधवारी रात्री त्यांना छातीत दुखायला लागलं म्हणून कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, रात्री १ च्या सुमारात त्याचं निधन झालं. रिमा लागू यांचे जावई विनय वायकुळ यांनी ही माहिती दिली आहे.

रिमा लागू यांच्या निधनाची बातमी येताच ट्विटर आणि सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. त्यांनी साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिकांना आणि आठवणींना ट्विटरकरांनी उजाळा दिला आहे. अनेकांनी आपल्यासाठी ही न्यूज शॉकींग असल्याचं ट्विट केलं आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये सध्या ट्विटरवर #reemalagoo #रिमालागू असे ट्रेन्ड सुरू आहेत.

हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेली आई सर्वांनाच भावली. सुरूवातीला नाटक, मराठी सिनेमा आणि मग बॉलिवूड असा त्यांच्या अभिनयाचा प्रवास झाला. मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. वास्तव, हाम आपक है कौन, आशिकी, साजन आणि बिंधास्त या सिनेमांमध्ये त्यांनी साकारलल्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीला उतरल्या.

Similar News