'माझे असत्याचे प्रयोग'

Update: 2017-10-02 06:02 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंतीचं निमित्त साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राज यांनी एक कार्टून काढले असून त्यामध्ये गांधींच्या हातात 'माझे सत्याचे प्रयोग' ही त्यांच्या आत्मकथा दाखवली आहे, तर मोदींच्या हातात 'माझे असत्याचे प्रयोग' हे पुस्तक दाखवले आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबुक पेजवर वरील कार्टून प्रसिद्ध केले आहे.

फेसबुक पेज सुरू केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी राज यांच्या निशाण्यावर आहेत. फेसबुक पेज सुरु करताना केलेल्या भाषणात त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांनी दाऊदला भारतात आणण्याच्या मुद्द्यावर मोदींना लक्ष्य करणारे कार्टून काढले होते. आता त्यांनी मोदींवर दुसरे कार्टून काढले आहे.

 

Similar News