पुन्हा ‘पिकनीक चलें हम’

Update: 2017-05-20 18:22 GMT

राज्यातील शाळांमध्ये बंद झालेली शैक्षणिक सहल आता या वर्षापासून पुन्हा सुरु होणार आहे. शासनाने त्यासंदर्भात निर्णय जाहिर केला आहे. राज्यातल्या ५ वी ते १० वी च्या सर्व माध्यमातल्या शाळांना हा नियम लागू असेल. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतीक, शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पहाण्यास मिळाव्यात यासाठी सहलीचे किंवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास शासनाने शाळांना मंजूरी दिली आहे.

एका महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान अपघात झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागासोबत शालेय शिक्षण विभागही खडबडून जागा झाला होते. त्यानंतर सहल आयोजिक करण्यासाठी २७ कलमांची नियमावली उपसंचालकांनी लागू केली होती. त्यातल्या अटी एवढ्या जाचक होत्या की त्यामुळे शाळांना ‘सहल नको पण नियम आवरा’ असं म्हणायची वेळ आली होती. परंतू शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा सहलींचा आनंद लुटता येणार आहे.

Similar News