नाना पटोलेंनी घेतली यशवंत सिन्हांची भेट : भाजपचा मोदी विरोधी गट सक्रीय

Update: 2017-10-15 15:51 GMT

भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी गट सक्रीय झाला आहे. रविवारी सायंकाळी भाजपचे नेते यशवंत सिन्हा आणि खा. नाना पटोले यांच्या नागपूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत नोटबंदी, शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपमध्ये नाराज असलेल्या य़ा दोन्ही नेत्यांमध्ये नागपूरात बैठक झाल्याने पुन्हा एकदा भाजपमधला मोदी विरोधी गट सक्रीय झाल्याचं दिसतंय.

नोटबंदीनंतर देशाची आर्थीक स्थिती खालावली, असं म्हणत काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर थेट टीका होती. त्यासोबतच ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप खासदारांना बोलू देत नाही, मोदींना बोलणारी माणसं आवडत नाहीत’ असं म्हणत भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली. हे दोन्ही नेते नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या नागपूरातील बैठकीला वेगळं महत्त्व आहे.

भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर नाराज असलेले अनेक नेते आहेत. यात छत्रुगन सिन्हा, खा. नाना पटोले, यशवंत सिन्हा, अरुण शौरी अशी मोठ्या नेत्यांचा यात समावेश आहे. भाजपमधील मोदींच्या कारभारावर नाराज असलेल्या या नेत्यांची लवकरच एक बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर अनेक क्षेत्रातील

लोकांमध्ये नाराजीचा सुर आहे. आता पक्षातील मोठ्या नेत्यांमधूनंही भाजपला घरचा आहेत मिळतोय. त्यामुळे विरोधकांनाही एक आयतं कोलीत मिळालंय.

Similar News