ठाकरेंच्या पोरांची काय झाली चर्चा?

Update: 2017-09-17 09:39 GMT

एकीकडे उद्धव आणि राज ठाकरेंचे एकत्र येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसताना या दोघांची मुलं मात्र एकत्र आलीयेत. निमित्त होतं मुंबईतल्या एका फुटबॉल स्पर्धेचं. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आली. दोघांनी एकमेकांशी गप्पाही मारल्या. त्यांचे सोबतचे फोटो व्हायरल झाले अन् राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला. मागच्या पिढीत दुरावलेले संबंध या पिढीत सुधारणार का? याचीही चर्चा सुरू झाली.

मात्र ही चर्चा सुरू असतानाच शिवसेनेकडून घाईघाईने खुलासा प्रसिद्ध करण्यात आलाय. या खुलाशात म्हटलंय,

"आदित्य ठाकरे एमडीएफएचे अध्यक्ष असल्यामुळे एका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकानी आदित्य यांची भेट मागितली होती, त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी फिगो ह्यांची सदिच्छा भेट घेतली, तिथे अमित ठाकरे देखील उपस्थित होते, इतरही १०-१२ जण होते, त्या वेळी आदित्य आणि अमित भेटले, ह्यात विश्लेषण करण्यासारखे काही घडले नाही, राजकीय चर्चा देखील झाली नाही."

अर्थात एवढ्या तातडीनं आणि तत्परतेने शिवसेनेचा आलेला हा खुलासा भेटीत काय घडलं याची उत्कंठा अधिक वाढवणारा म्हणावा लागेल.

Similar News