ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन

Update: 2017-03-22 04:30 GMT

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि महाराष्ट्र टाईम्सचे माजी संपादक गोविंद तळवलकर यांच वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. सध्या ते अमेरिकेत राहत होते.

गोविंद तळवलकर यांनी सुमारे 27 वर्ष महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. याशिवाय त्यांनी लोकसत्ता, टाईम्स आँफ इंडिया, इलुस्ट्रेटेड वीकली, द हिंदू, द डेक्कन हेराल्ड, रॅडिकल ह्यूमनिस्ट आणि फ्रंटलाईन अशा इंग्रजी वृत्तपत्र आणि साप्ताहिकांमधूनसुद्धा लेखन केले.

२२ जुलै १९२५ रोजी डोंबिवलीतील सुसंस्कृत घरात जन्मलेले गोविंद तळवलकर यांनी पदवी पूर्ण केल्यानंतर पत्रकारितेत प्रवेश केला होता. नवभारत या वृत्तपत्रातून त्यांनी त्यांची पत्रकाररीता सुरू केली. त्यानंतर ते तब्बल 12 वर्ष लोकसत्तामध्ये उपसंपादक होते. लोकमान्य टिळक आणि एम. एन. रॉय यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. परखड पण त्याचबरोबर सामान्यांना समजेल अशी त्यांची भाषाशैली होती. राजकीय भाष्यांबरोबरच त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ संपादक म्हणून समाजाचं प्रबोधन केलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहली आहेत. त्यांच्या जाण्यानं मराठी वृत्तपत्र पत्रकारीतेतील एका पर्वाचा अंत झाला आहे.

Similar News