जलयुक्त शिवारचा निधी खर्चच होत नाही, सरकारची कबुली

Update: 2017-04-06 09:08 GMT

राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा निधीच खर्च होत नसल्याची धक्कादायक बाब आज विधान परिषदेत उघड झालीय. आमदार परिणय फुके आणि इतर सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात जलसंधारण मंत्र्यांनी ही बाब कबुल केली आहे. 3 - 4 वेळा मुदतवाढ देऊनही निधी खर्च होत नसल्याचं जसलंधारण मंत्री राम शिंदे यांनी कबुल केलंय. 2015- 16 या आर्थिक वर्षात मुदतवाढ देऊनही मंजूर निधी पैकी जून 2016 पर्यंत 167.40 कोटी इतका निधी खर्चच झालेला नाही. तर 2016-17 या वर्षासाठी दिलेल्या निधी पैकी अजून 21 कोटी 14 लाख खर्च झालेले नाहीत. त्यामुळं या वर्षीही जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. आर्थिक वर्षांत मंजूर झालेली कामे उशिरा सुरु होतात आणि म्हणून ती आर्थिक वर्षात पूर्ण होत नसल्याचं राम शिंदे यांनी म्हटलंय.

 

Similar News