गुन्हेगारीत नागपूरने राखली 'पत'!

Update: 2017-12-04 11:00 GMT

यंदाही गुन्हेगारीत नागपूर अग्रेसर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘होम टाऊन’ नागपूर शहराने वाढ नोंदवत गुन्हेगारीतील आपले द्वितीय स्थान यंदाही राखले आहे. ‘नॅशनल क्राईन रेकॉर्ड ब्युरो’ तर्फे जाहीर करण्यात आलेल्या या वर्षीच्या गुन्हेगारी आकेडवारीत ही बाब समोर आली आहे. मागील वर्षीही नागपूर शहर या अहवालात दुसऱ्या स्थानावर होते. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या आकडेवारीनुसार देशात कोची शहरानंतर गुन्हेगारीच्या बाबतीत नागपूरचा दुसरा क्रमांक लागतोय. त्यामुळे एकीकडे पोलीस आणि तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तर दुसरीकडे स्वतः गृहमंत्रीही असणारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी हा गुन्हेगारी अहवाल चिंता वाढवणारा ठरणार आहे. मात्र एवढा मोठा अहवाल जाहीर झाल्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने संपर्क करुन ही नागपूर पोलीस दलातील एकाही मोठ्या पोलीस अधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीचा फोन उचलला नाही.

सर्व प्रकारच्या गुन्ह्यात वाढ

२०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये ५.३ टक्क्यांची गुन्हयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागपूर, पुण्याने गुन्हेगारीत मुंबईलाही मागे टाकले आहे. चोऱ्या, दरोडे, रॅगिंग, छेडछाड ते अपहरण, बलात्कार आणि खून अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यात अग्रेसर राहत नागपूर आपली ‘क्राईम सीटी’ ही ओळख जपली आहे.

क्राईम कॅपीटल 'नागपूर'चा गुन्हेगारी आकडेवारी

गुन्हे २०१५ २०१६

महिलांवरील गुन्हे १३१३ १३७९

खुन ९२ ९९

अपहरण ३५५ ५०९

जीवघेणा हल्ला ९० १०३

हुंडाबळी ०६ ०६

महिलांवरील अत्याचारात लक्षणीय वाढ

या अहवालातील अत्यंत धक्कादायक आणि धोकादायक बाब म्हणजे महिलांसंबधीत गुन्ह्यांमध्ये झालेली मोठी वाढ. या अहवालातील आकडेवारीनुसार शहरात सर्वाधिक गुन्हे हे महिलांवरील आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या आकडेवारीत नागपूरमध्ये पाचामधील एकाची काही ना काही गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे. असेच जर मुख्यमंत्रीच गृहमंत्री असलेल्या नागपूर शहराचे हे वास्तव असेल तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीचे आश्चर्य वाटायला नको.

नागपूरकारांच्या मनात असुरक्षिततेची भावना

प्राचार्य वानखेडेंच्या खुनाची घटना ताजी असतनाच, काही दिवसांपूर्वी शहरातील लॉटरी व्यापारी राहुल आग्रेकर यांचं अपहरण करुन खंडणीसाठी त्याला जिवंत जाळण्यात आलं, गुन्हेगारीच्या या वाढत्या घटनांमुळे नागपूरकरांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Full View

Similar News