सदाभाऊंवरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल...

Update: 2017-09-05 13:39 GMT

कोल्हापुुरातीस एका गणपती मंडळाच्या देखाव्यात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना टार्गेट करण्यात आलं असून या जिवंत देखाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी आमदार सुरेश साळोखे संस्थापक अध्यक्ष असलेल्या ताराबाई रोडवरील मित्रप्रेम गणेश मंडळात जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. शेेतक-यांच्या समस्यांवर हा देखावा असून यामध्ये एका दृश्यात भाऊ नावाचं एक पात्र दाखवलं गेलंय. हे भाऊ सरकारनं शेतक-यांसाठी केलेल्या कामाचा पाढा वाचतात. मात्र शेतकरी उलट त्यांना जाब विचारतात असं या देखाव्यात दाखवण्यात आलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊंबरोबर ताणलेले संबंध पाहता असा व्हिडिओ व्हायरल न झाला तर नवल!

Full View

Similar News