खासदार संजय काकडेंना दणका 

Update: 2017-09-16 06:40 GMT

पुण्यातील न्यू कोपरे गावठाण पुनर्वसन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना ठरलेल्या मुदतीत घरांचा ताबा न दिल्याप्रकरणी काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. गोटे यांनी दिले आहेत.

संजय काकडे यांच्यासह त्यांचे बंधू सूर्यकांत काकडे, अशोक यादव यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश वारजे पोलिसांना कोर्टाकडून देण्यात आले. या प्रकरणी प्रकल्पग्रस्त दिलीप मोरे यांनी कोर्टात खासगी तक्रार दिली होती. या तक्रारीवर सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाकडून काकडे यांच्यासह तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, अशी माहिती प्रकल्पग्रस्तांच्या वतीने अ‍ॅड. सुरेखा वाडकर यांनी दिली. न्यू कोपरे गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना सदनिका देण्याबाबत सन २००१ मध्ये करार झाला होता. तीन वर्षांत त्यांना सदनिका देण्याचे मान्य करण्यात आले होते. न्यू कोपरे गावठाणातील ४०१ जणांपैकी ८७ जणांना सदनिका मिळाल्या नाहीत. पहिले पुनर्वसन नंतर विकसन ही अट घालून देण्यात आली होती. मात्र, काकडे यांच्याकडून करारातील अटींचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे गेली सतरा वर्ष ८७ जण घरापासून वंचित राहिले.

न्यायालयीन लढाईबरोबरच प्रकल्पग्रस्तांकडून काकडेंविरोधात आंदोलनही सुरू होते. काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी काकडेंच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. युवक क्रांती दलाचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

https://www.youtube.com/watch?v=387oDp_8pOQ&feature=youtu.be

Similar News