ईव्हीएम मशिन हॅक?

Update: 2017-02-25 13:48 GMT

राज्यातल्या 10 महापालिकांचे निकाल आल्यानंतर सोशल मीडियावर एकाच प्रकारच्या मेसेजेचा पूर आलाय. ते मेसेजेस आहेत ईव्हीएम मशिन संदर्भातले. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड करून, हॅक करून किंवा घोळ घालून भाजपनं त्यांचा विजय साध्य केल्याचा आरोप या मेसेजेसमध्ये केला जात आहे. वेगवेगळ्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर वेगवेगळे मेसेजेस वेगवेगळ्या लोकांच्या नावानं फिरत आहेत.

या मेसेजेसमध्ये सर्व पराभूत उमेदवारांना एकत्र येण्याच आवाहन करण्यात येतंय. तसंच भाजपच्या विरोधात असलेल्या मुद्द्यांचा दाखला सुद्धा दिला जातोय. मराठा क्रांती मोर्चानं काढलेल्ये फतव्याचा सुद्धा आधार घेतला जात आहे.

नाशिकमध्ये घडलेला प्रकार सध्या सर्वात जास्त व्हायरल आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप सोडून इतर पक्षांच्या उमेदवारांना शून्य मतं पडल्याचं व्हायरल केलं जातं आहे, पण प्रत्यक्षात तसं नसल्याचं माहीत पडत आहे. प्रत्यक्ष मतांची गणणा करतांना घोळ झाल्याचा दावा पराभूत उमेदवारांनी केलाय. इथल्या उमेदवारांनी आता कोर्टात जाण्याची तयारी केली आहे.

 

ईव्हीएम मशिन्स कशा चुकीच्या आहेत. त्या कशा हॅक केल्या जाऊ शकतात याचे दाखले देणाऱ्या पोस्ट सुद्धा व्हायरल आहेत. शिवाय कुठल्या कुठल्या देशांमध्ये या मशिन्स बाद ठरवण्यात आल्या आहेत याची यादी सुद्धा कारणांसह व्हॉट्स ऍपवर दिली जातेय.

आता भाजपविरोधात असा प्रचार सुरू असतांना त्यांची सोशल मीडिया आर्मी गप्प बसेल असं होईल का. या मुद्द्यावरून विरोधकांची हावा काढणारे जोक्स सुद्धा आता व्हायरल व्हायला सुरूवात झालीय.

एकूणच काय तर सोशल मीडियावर ईव्हीएम मशिन्स बाबातच्या अफवांना आता चांगलाच पूर आला आहे.

Similar News