एबीपी माझाच्या टीआरपीमध्ये घसरण

Update: 2017-04-07 11:45 GMT

एपीबी माझा या वृत्तवाहिनीच्या टीआरपीमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये घसरण झाली आहे. हा आमचा दावा नाही. तर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडिया म्हणजे बार्क या संस्थेच्या ताज्या आकड्यांमधून हे सिद्ध झालं आहे.

११ व्या आणि १२ व्या आठवड्यातील आकडेवारी

सरलेल्या २ आठवड्यांमध्ये एबीपी माझाला त्यांचा पहिला क्रमांक टिकवता आलेला नाही. बार्कच्या गेल्या 2 आठवड्यांमधील आकड्यांवर नजर टाकली तर ते सहज लक्षात येईल

बाराव्या आणि तेराव्या आठवड्यातील आकडेवारी

महत्त्वाचं म्हणजे गेल्या आठवड्यात एबीपीच्या ग्रामीण भागातील टीआरपीमध्ये सुद्धा घसरण झाली आहे. याचा अर्थ ग्रामीण भागात लोकांनी या चॅनेलकडे पाठ फिरवलीय असा होतो.

महत्त्वाचं म्हणजे गेल्या २ आठवड्यात बार्कन मराठी वाहिन्यांच्या प्रसिद्ध केलेल्या टॉप-5 च्या आकडेवारीत सुद्धा एबीपी माझा ही वृत्त वाहिनी कुठेच नाही. या पहिल्या पाच वाहिन्यांमध्ये झी समुहाच्या मराठी वाहिन्यांच्या बोलबाला आहे. तसंच त्यात एकमेव वृत्तवाहिनी आहे ती म्हणजे झी २४ तास.

 

Similar News