एनडीएतून 'स्वाभिमानी' अखेर अधिकृतपणे बाहेर

Update: 2017-09-04 14:10 GMT

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएतून बाहेर पडत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देऊन राजू शेट्टी आज अधिकृतपणे एनडीएतून बाहेर पडले आहेत. यासोबतच वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राजू शेट्टींनी पाठिंबा मागे घेत असल्याचे आणि एनडीएतून बाहेर पडत असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत नसल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएतून बाहेर पडली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेले सदाभाऊ खोत अजूनही राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यावर शेट्टी यांना विचारले असता, त्यांचा आणि आमचा आता काहीही संबंध नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. https://youtu.be/_KtHMMXz4yA

Similar News