ऊर्जामंत्री खोटे ठरले, ग्रामीण भागात भारनियमन सुरूच

Update: 2017-10-19 11:45 GMT

धुळे : राज्यात मध्यंतरी झालेले भारनियमन हे तात्पुरतं होतं, दिवाळीत भारनियमन होणार नाही, असं ठाम वक्तव्य महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. मात्र ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भारनियमन सुरूच असल्याचं उघड झालं आहे. धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावालगत असलेल्या शेतात दिवसभरातून फक्त 6 तास वीज मिळत आहे. तब्बल 16 तास भारनियमन केलं जातं आहे अशी माहिती दातर्ती गावातील शेतकरीनी मॅक्स महाराष्ट्रकडे दिली आहे. यातून सिद्ध होत आहे की ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खोटे ठरले आहेत...*

अंधार पडला म्हणजे भारनियमन नाही हे समजून घेणे आवश्यक आहे, यासाठी ग्राहकांनी वीजपुरवठा खंडीत झाल्यास आधी त्याची तक्रार महावितरणच्या स्थानिक अभियंत्याकडे करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी यावेळी केले होते,मात्र दातर्ती गावातील शेतकरी वारंवार होणाऱ्या भारनियमनला त्रस्त झाले आहेत वेळो वेळी तक्रार देऊन देखील भारनियमन थांबत नाही. शेतीसाठी पाणी आहे मात्र लाईट नाही. मध्यरात्री लाईट येत असून शेतकरी जीव मुठीत धरून शेतीला पाणी देत आहे.

Full View

Similar News