आमदार अनिल गोटे यांच्या भावाचा अपघाती मृत्यू

Update: 2017-08-25 12:51 GMT

नागपुरवरून परभणीकडे जाणा-या एका कारला पैनगंगा नदीवर समोरून येणा-या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने आ.अनिल गोटे यांचे बंधु ज्ञानेश्वर गोटे व त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्वर गोटेसह फोर्डफिगोचा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान हदगाव ते उमरखेड रस्त्यावर पैनगंगा नदिवरील पुलावर आ.अनिल गोटे यांचे बंधु ज्ञानेश्वर गोटे यांच्या कारला ट्रक क्रमांक एमएच २४ यू ८१०९ याने पैनगंगा नदिच्या पुलावर पाठीमागून जोराची धडक मारल्यामुळे नदिवरील पुलाला कठडे नसल्यामुळे कार पुलावरून खाली नदीत कोसळली. या अपघातात तिघांचा पाण्यात बुडून करून अंत झाला. मात्र ट्रक चालक न थांबता तिथून फरार झाला पण काही प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून हदगाव पोलीसांनी आपल्या कार्याची तत्परता दाखवत पोबारा करणा-या ट्रक चालकाला ट्रकसह आर्णी पोलीसांनी पकडले असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय .दरम्यान मृतांचे मृतदेह नदीतून वर काढले असून तिघांचेही मृतदेह हदगाव येथील उपजिल्हारूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Similar News