अश्लील कवी मनाविरोधात श्रमजीवी ठिणगीचा दणका

Update: 2018-09-29 13:48 GMT

आदिवासी मुलींच्या स्तनांनाबाबत विकृत वर्णन करून समस्त महिला वर्गाचा विनयभंग करणाऱ्या विकृत कवी दिनकर मनवर विरोधात आज श्रमजीवी महिला ठिणगी रस्त्यावर उतरलेली दिसली. आदिवासी युवतीच्या सन्मानार्थ श्रमजीवी ठिणगी मैदानात या घोषणेने आज चार जिल्ह्यात श्रमजीवी युवतींचा आवाज दणाणला. सर्व तहसीलदारांना निवेदन देऊन मनवर यावर कारवाई करण्याची मागणी करत ही कविता प्रकाशित करणारे आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात घेणारे आशा सर्व दोषींना आरोपी करण्याची मागणी यावेळी श्रमजीवीने केली. यावेळी प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात मनवर, प्रकाशक, आणि विद्यापीठाच्या अभ्याक्रमात कविता समाविष्ट करणारे सर्व संबंधित जबाबदार यांच्या विरोधात अट्रोसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याबाबत फिर्याद केली.

विकृत माथेफिरू कवी दिनकर मनकर याने आपल्या दृश्य नसलेल्या दृश्यात नामक कविता संग्रहात अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बीए च्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत श्रमजीवी संघटना महिला ठिणगी आक्रमक झाली आहे. आज या माथेफिरू कवी आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ ठाणे,पालघर,रायगड आणि नसिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले होते.

मुंबई विद्यापीठाच्या बीए तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात पाणी कसं अस्तं या शिर्षकाखाली प्रकाशित केलेल्या कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे ,विनयभंग करणारे वर्णन आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगी च्या कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून आता याविरोधात आज सर्वत्र आंदोलनं झाली. मनवर या विकृत कविवर कारवाई होत नाही तो पर्यंत ही आंदोलनं थांबणार नाही असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Similar News