रायगडमध्ये बचत गटाच्या माध्यमातून महिलांचा शेतीत अभिनव प्रयोग

रायगड जिल्ह्यातील महिलांची राज्यभर चर्चा सुरु आहे पण का? नेमकं काय केलं आहे महिलांनी जाणून घेण्यासाठी पहा धम्मशिल सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

Update: 2022-10-19 12:55 GMT

रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार मानले जाते. पण गेल्या काही वर्षांमध्ये हवामानात सातत्याने होणारे बदल यांमुळे भातशेतीवर गंभीर परिणाम होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर रायगड जिल्ह्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अभिनव प्रयोग केला आहे.

Full View

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील राबगाव येथील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत शेतीत नवा प्रयोग सुरु केला. यामध्ये गजानन बचत गटातील महिलांनी रोहा आणि दापोली कृषी केंद्र आणि कृषीमित्रांच्या मार्गदर्शनाने भुईमुगाची शेती करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भुईमुगाच्या माध्यमातून चांगला फायदा होत असल्याचे महिला सांगतात.

कोण म्हणतं कोकणात भुईमुगाचे पीक येत नाही, असं म्हणत कोकणात भातशेतीला भुईमुगाचा पर्याय असल्याचे महिला शेतकऱ्याने सांगितले. तसेच नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हतबल होतात. मात्र महिलांनी एकत्र येत भुईमुग आणि हळदीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्हाला चांगला नफा मिळतो, असं महिलांनी सांगितले. त्यामुळे महिलांच्या या अभिन उपक्रमाची राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या महिला शेतीच्या मशागतीपासून ते भुईमुग विक्रीपर्यंत सगळी कामं स्वतःच करतात. त्यामुळे महिलांच्या अभिनव उपक्रमाचे कौतूक होत आहे. 

Tags:    

Similar News