माहुलवासी कधी घेणार मोकळा श्वास?

Update: 2019-12-19 13:11 GMT

गेल्या दोन वर्षांत प्रकल्पग्रस्त वसाहत आणि माहुल गावात प्रदूषणाने दिडशेहून अधिक बळी घेतले आहेत. ८०० हून अधिक लोकांना दूर्धर आजाराने ग्रासले आहे. मृतांचा आकडा दर दिवशी वाढतच चालला आहे. माहुलमध्ये मरण स्वस्त झालंय.

वसाहतीतील प्रत्येक घरात आजाराने घर केलं आहे. तर दुसरीकडे माहुल वासियांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. सततच यश अपयश अशी स्थिती माहुल वासियांच्या पदरी पडत आहे .हाय कोर्टच्या निकलाविरूद्ध महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली .

“महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे त्यामुळे नवीन राज्य सरकार माहुलमधील प्रदूषणाचा त्रास रोखण्यासाठी हस्तक्षेप करत माहुलवसियांना न्याय देईल अशी आशा मावळली आहे.” याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे घर बचाव आंदोलनाचे बिलाल खान यांनी दिली…

Full View

Similar News