उन्नाव प्रकरण : तुम्ही या देशात VVIP असाल तर काहीही करु शकता – राजदीप सरदेसाई

Update: 2019-07-31 15:50 GMT

या देशात तुम्ही जर VVIP असाल तर तुम्ही काहीही करू शकता. जेल मधून साक्षीदारांना संपवू शकता. पिडीत तरूणीला ही मारू शकता.. हे सर्व एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, इतकं सगळं करणाऱ्या माणसावर पक्ष काहीही कारवाई करत नाही, कारण तो तुमचा आमदार आहे, नेता आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील एका मुलीने 2017 मध्ये भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुलीच्या कुटुंबाला धमक्या येऊ लागल्या. हे प्रकरण दाखल झाल्यानंतर या मुलीच्या वडिलांना 5 एप्रिल ला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांचा कारागृहातच मृत्यू झाला. माध्यमांमुळे सरकारवर दबाव वाढल्यानंतर योगी सरकारने दोषींविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर या प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला, यावरुन हे प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव होते. त्यानंतर अलिकडेच 28 तारखेच्या रात्री अचानक उन्नाव बलात्कार पीडितेच्या गाडीला ट्रक ने ठोकर मारल्याने झालेल्या अपघातात ती पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून पीडितेची आई, काकू आणि वाहनचालकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर पीडितेचे वकील देखील जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे भारतीय़ जनता पक्षाचे महत्वाचे नेते अजुनही या आमदाराची जेलमध्ये जाऊन भेट घेत आहेत

Full View

Similar News