ऐकावं ते नवलच! चक्क कचरा व्यवसायावर आर्थिकमंदीचं सावट

Update: 2019-09-19 12:55 GMT

देशातील प्रमुख क्षेत्रांना आर्थिक मंदीच्या सावटाखाली आलेले असताना त्यात आता आणखी एक क्षेत्राची भर पडली आहे. चक्क कचरा उद्योगाला मंदीची झळ बसत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक कचरा सकंलन केंद्र आहेत. यात हजारो कचरावेचक काम करतात. याच कचऱ्यावर कचरावेचकांची उपजीविका होत असते. गेल्या काही महिन्यांत आर्थिक मंदीचा फटका प्रत्येक क्षेत्राला बसला. त्यामुळे कचरा निर्मिती कमी झाली. काही महिन्यांपूर्वी ४ रुपये किलो असणारा कचरा आता २ ते अडीच रुपये किलो झाला आहे.

त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने कचरावेचकांचा पगार कसा करायचा हा विवंचनेत सध्या केंद्र चालक आहेत. तर महागाईच्या काळात तुंटपुज्या पैशात उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न कचरावेचकांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठमोठ्या उद्योगांना आर्थिक मंदीच्या कचाट्यातून सोडवत असताना कचरा उद्योगासारख्या छोट्या क्षेत्राकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

 

https://youtu.be/4xlUuD2TBhs

 

 

 

 

 

Similar News