धोकादायक इमारतींमधून स्थलांतरीत व्हा - पालिकेचा इशारा

Update: 2019-07-20 11:46 GMT

दरवर्षी पालिका प्रशासनातर्फे उपनगर आणि शहरातील सर्व खाजगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबई पालिका धोकादायक इमारतीची यादी जाहीर करते. गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार अतिधोकादायक 319 इमारती होत्या तर यंदा 499 इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. त्याची यादी पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. 499 पैकी 14 इमारती पाडण्यात आल्या असून 485 इमारती अजुनहीं धोकादायक आहेत. पालिका धोकादायक इमारतींची नोटीस नागरिकांना देत असते. मात्र नोटीस दिल्या नंतर देखील लोक त्याच इमारतीमध्ये राहतात.

डोंगरी मध्ये इमारत कोसळून झालेल्या अपघातात 13 लोकांना जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने ट्वीट द्वारे लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचा इशाराच दिला आहे.

Similar News