शिवसेनेच्या उमेदवारानेच फोन करून पाठिंबा मागितला - श्रीपाद छिंदम

Update: 2018-12-28 10:07 GMT

काही महिन्यापूर्वी शिवरायांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीत छिंदम याने शिवसेनेला मतदान केले. सेनेने त्यामुळे सभागृहात छिंदम याला चांगलीच मारहाण केली तसंच त्याचे मतदान नाकारले आहे. ही भाजप व राष्ट्रवादीची खेळी आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. तर आता छिंदमने शिवसेनेकडून फोन आल्याचा दावा करत माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लीप सादर केली. तर ही क्लीप बनावट असल्याचे बोराटे यांचे म्हणणे आहे.

तर यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने ही भाजप व राष्ट्रवादीची खेळी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. छिंदम अपक्ष म्हणून निवडून आला आहे. तो कोणाला मतदान करणार याची उत्सुकता होती. त्याने सेनेच्या उमेदवार बाळासाहेब बोराटे यांना मतदान करण्यासाठी हात उंचावला. त्यावेळी सेनेच्या नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली. तसेच सेनेने पुढील निवड प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभात्याग केला. आम्ही छिंदमचे मत मागितले नव्हते. मात्र, भाजपचे खासदार दिलीप गांधी व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छिंदमशी हातमिळवणी करुन मुद्दामहून आम्हाला बदनाम करण्यासाठी त्याला सभागृहात उपस्थित ठेवून सेनेला मतदान करायला लावले, असा आरोप सेनेचे बाळासाहेब बोराटे व युवराज गाडे यांनी केला आहे.

Full View

राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अहमदगरमध्ये भाजपचा महापौर -

आज अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणुक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपाने ३७ जागांसह अग्रस्थान पटकावले असून बाबासाहेब वाळके यांची महापौरपदी निवड केली आहे. राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. वाकळे यांना ३७ मतं मिळाली.

त्यात भाजपचे १४, राष्ट्रवादी १८, बसपा ०४ अपक्ष ०१ अशी मतं वाकळे यांना मिळाली.

तर सेनेच्या बोराटे यांना २४ मतं मिळाली. तर कॉंग्रेसने या निवडणुकीवर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

Similar News