सौदीतील महिला चालवणार भुंगभुंग गाडी…

Update: 2018-06-25 12:23 GMT

सौदी अरेबियात महिलांवर कडक बंधने आहेत, मात्र ती हळूहळू शिथील होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत सौदीतील महिलांना फक्त गाडीत बसण्याची परवानगी होती, पण नुकत्याच झालेल्या एका निर्णयानुसार आता सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सौदीची संपूर्ण अर्थव्यवस्था ही तेल, गॅस, व हज यात्रेपासून होणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून अाहे, हीच अवलंबता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अर्थव्यवस्थेचा गाढा सुरऴीत चालवण्यासाठी उत्पादन आणि सेवा क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

महिलांना गाडी चालवण्याची परवानगीच्या या निर्णयावर जगभरातुन शुभेच्छांचा वर्षाव सुरु असला तरी महिलाना स्वतंत्र माणूस म्हणुन जगण्याचा अधिकार कधी मिळेल? असा एक प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Similar News