रत्नागिरी जिल्ह्यात रेशन काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई…

Update: 2020-04-29 14:18 GMT

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत रेशन धान्य वाटप करताना काळाबाजार होत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहे. सरकारने अशा अनेक दुकानांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत देखील काही रेशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे निर्देशनास येत आहेत. करोनाच्या संकटात सापडलेल्या कष्टकऱ्यांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून त्यांना मोफत धान्य देण्यात येत आहे. एकीकडे आपल्या हक्काचे धान्य मिळण्यासाठी गरिबांची धावपळ सुरू असताना गरिबांचे धान्य हिरावून घेण्याच्या घटनाही पुढे येऊ लागल्या आहेत.

आतापर्यंत अनियमितता आणि नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 87 रेशन दुकानांचे निलंबन, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अमरावती महसूल विभागात एकूण ५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात ४ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी २ गुन्हे अमरावती व अकोला जिल्ह्यात दाखल करण्यात आलेले असून त्या खालोखाल बुलडाणा जिल्ह्यात १ गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १ दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण विभागात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात ४ रेशन दुकाने निलंबित करण्यात आले आहेत. रायगड जिल्ह्यात ३ दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ९४३ रेशन दुकानं आहेत.

https://youtu.be/ZB49_LecTho

संबंधित बातमीची लिंक –

दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार – नायब तहसीलदार

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार…

दाभोळ: रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब, आता प्रतीक्षा कारवाईची…

 

या संदर्भात अधिक माहितीसाठी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी रत्‍नागिरी जिल्ह्या पुरवठा अधिकारी महेश पाटील यांना भ्रमणवध्वनी केलं असता

“आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात २ रेशन दुकानांनवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे गुन्हा नोंदवला असून दुसरा गुन्हा चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे नोंदवला आहे. तर रत्‍नागिरी जिल्ह्यातील दाभोळ आणि दापोली मधील तक्रारी प्रतीक्षेत असल्याची”

माहिती रत्‍नागिरी जिल्ह्या पुरवठा अधिकारी महेश पाटील यांनी दिली आहे.

रेशन धान्य दुकानातून प्राप्त होणाऱ्या धान्यावर पात्र लाभार्थ्यांचा अधिकार आहे. हे धान्य कुणी लाटण्याचे प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहरात १५ लाख ४५ हजार १३१ आणि ग्रामीणमध्ये १६ लाख ६७ हजार ५८४ लाभार्थी आहेत. आपले हक्काचे धान्य रेशन दुकानातून मिळवा, असे आ‌वाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अंत्योदय शिधापत्रिकाधारक

वाटपाचे परिणाम : दर

१५ किलो गहू : २ रुपये

२० किलो तांदूळ : ३ रुपये

१ किलो साखर : २० रुपये

१ किलो तूरडाळ : ५५ रुपये

१ किलो चनाडाळ : ४५ रुपये

१ किलो साखर : २० रुपये

प्राधान्य कुटुंब लाभार्थी

वाटपाचे परिणाम : दर

३ किलो गहू : २ रुपये

२ किलो तांदूळ : ३ रुपये

१ किलो तूरडाळ : ५५ रुपये

१ किलो चनाडाळ : ४५ रुपये

तर शासनाने रेशनिंगविषयी मार्गदर्शन आणि तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर दिले आहेत.

1800224950, 022-23720582 ,022-23722970, 022-23722483 ,022-23721912

Similar News