Top
Home > Max Political > दाभोळ: रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब, आता प्रतीक्षा कारवाईची...

दाभोळ: रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब, आता प्रतीक्षा कारवाईची...

दाभोळ: रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब, आता प्रतीक्षा कारवाईची...
X

स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळाबाजार वा वाटप करताना विहित प्रमाणापेक्षा कमी धान्य देणे किवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ गावात उघडकीस आला. कोरोनाच्या संकटकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.

यासंदर्भात ‘मॅक्स महाराष्ट्र’ने दाभोळमधील रेशनकार्ड ऑनलाईनच्या नावाखाली पुरवठा विभागाचा हा अनागोंदी कारभार २० एप्रिलला उघडकीस आणला. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शिधावाटप दुकानदारांना तसंच शासकीय अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिलाय.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची जबाबदारी आहे. या काळात नागरिकांना अन्न धान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर आहे. परंतु, रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील एकूण ३९ रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ८७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आहे तर एकूण ४८ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. असे असताना देखील राज्यात अश्या कथित काळाबाजाराच्या तक्रारी नागरिकांकडून अजूनही सुरू आहेत.

असाच गैरप्रकार मॅक्समहाराष्ट्र ने उघडकीस आणलाय. सामान्यांच्या हक्कासाठी मॅक्समहाराष्ट्रने पाठपुरावा केला. यानंतर २१ एप्रिलला दापोली तहसीलदार कार्यालयातून सदर प्रकरणाची शहानिशा झाली. सदर प्रकरणाचा अहवाल काल म्हणजे २३ एप्रिलला दापोलीचे तहसीलदार समीर घाडे यांच्याकडे देण्यात आला.

https://youtu.be/ZB49_LecTho

संबंधित बातमीची लिंक –

दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार – नायब तहसीलदार

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार…

या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘मॅक्स महाराष्ट्र’चे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी दापोलीचे तहसीलदार समीर घाडे यांना भ्रमणध्वनी केला असता

"दाभोळमधील काही लोकांची अशी तक्रार आहे की केशरी कार्ड आम्ह्यला मिळालं आहे मात्र केशरी कार्डवरती धान्य मिळालेलं नाही. अश्या लोकांना मे आणि जूनमध्ये धान्य देणार आहोत. यामध्ये ६-७ नागरिकांची लेखी तक्रार आहे की त्यांचे ऑनलाईन धान्य उचललं गेलं आहे मात्र वस्तुस्थिती ही आहे की त्यांना धान्य मिळालं नाही. ऑनलाईन धान्य उचललं गेलेल्या नागरिकांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे किती धान्य देय आहे आणि प्रत्यक्षात किती दिलं आहे. या दोहांची तफावत पडताळून आलेल्या धान्याचा अहवाल बनवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कलेक्टर यांच्याकडे प्रस्ताव पाठवणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ऑनलाईन धान्य उचललं गेलंय आणि त्या लोकांना मिळालं नाही त्या धान्याचा गैरवापर केल्याप्रकरणी त्या धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल करावा लागेल. या प्रकरणाचा रत्‍नागिरी जिल्ह्या पुरवठा अधिकारी महेश पाटील यांना रिपोर्ट पाठवून त्यांची परवानगी मिळाली की गुन्हा दाखल करणार. कारण यामध्ये सर्वसामान्य लोकांची फसवणूक होता कामा नये"

असं दापोली तहसीलदार समीर घाडे यांनी सांगितलं.

दरम्यान पुरवठा विभाग आणि शिधावाटप केंद्र चालक यांचा कथित गैरव्यवहारामध्ये तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी व वंचित असणाऱ्या कार्डधारकांना त्वरित धान्याचा पुरवठा केला जावा अशी मागणी दाभोळ मधील नागरिकांनी केली आहे. आता रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब झालंय, मात्र आता नागरिकांना प्रतीक्षा कारवाईची आहे.

Updated : 24 April 2020 2:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top