Top
Home > Max Political > दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार - नायब तहसीलदार

दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार - नायब तहसीलदार

दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार - नायब तहसीलदार
X

देशात आणि राज्यात करोनामुळे मोठे संकट उभे राहिले आहे. या काळात केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र या उपाय योजना खरंच लोकांपर्यंत पोहचत आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळमध्ये लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. शासन आणि प्रशासन रेशनवर सर्वाना धान्य मिळेल असं बोललं असताना देखील दाभोळ गावात ऑनलाईन नोंदणी न केलेल्या रेशन कार्ड धारकांना धान्य दिले जात नसल्याची बाब समोर आली.

यासंदर्भात 'मॅक्स महाराष्ट्र'ने दाभोळमधील रेशनकार्ड ऑनलाईनच्या नावाखाली पुरवठा विभागाचा हा अनागोंदी कारभार २० एप्रिलला उघडकीस आणला.

https://youtu.be/ZB49_LecTho

संबंधित बातमीची लिंक -

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार…

पुरवठा विभाग आणि शिधावाटप केंद्र चालकांच्या कथित गैरव्यवहाराबाबत नागरिकांमध्ये रोष आहे. यानंतर आज २१ एप्रिलला दापोली तहसीलदार कार्यालयातून सदर प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी नायब तहसीलदार स्मिता घडशी यांना पाठवण्यात आले. दाभोळमधील अनेक नागरिकांनी धान्य न घेताच त्यांच्या नावावर धान्य दिल्याचं ऑनलाईन दाखवलं जात आहे. प्रत्यक्षात मिळालेले धान्य आणि ऑनलाईन दाखवले जात असलेले धान्य यामधील आकड्यात तफावत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या प्रकरणासंदर्भात नायब तहसीलदार स्मिता घडशी यांनी दाभोळमधील नागरिकांच्या लेखी तक्रारी घेतल्या.

DABHOL ration

या संदर्भात अधिक माहितीसाठी ‘मॅक्स महाराष्ट्र’चे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी नायब तहसीलदार स्मिता घडशी यांच्याशी बातचीत केली.

"काही नागरिकांच्या बायोमेट्रिकवरून धान्य उचल्याचं दिसतंय. मात्र, त्यांना धान्य मिळालं नसल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. यासंबंधी तक्रारदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अहवाल उद्या केला जाणार असून या प्रकरणा संदर्भात प्रथमदर्शनी पाहिलं तर नागरिकांचा धान्य ऑनलाईन थंबवर उचललं गेल्याची तक्रार नागरिकांची आहे. या संदर्भात मी अहवाल सरांसमोर मांडून प्रथमदर्शनी हे धान्य माधुरी शिगवण यांच्या थंबवर उचललं गेल्याचं दिसतंय. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. जर रेशन धान्य दुकानदार यात दोषी आढळले तर त्यांचा परवाना ही रद्द केला जाईल"

असं नायब तहसीलदार स्मिता घडशी यांनी सांगितलं."

DABHOL ration

दरम्यान पुरवठा विभाग आणि शिधावाटप केंद्र चालक यांचा कथित गैरव्यवहारामध्ये तहसीलदार यांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी व वंचित असणाऱ्या कार्डधारकांना त्वरित धान्याचा पुरवठा केला जावा अशी मागणी दाभोळ मधील नागरिकांनी केली आहे.

Updated : 21 April 2020 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top