रस्त्याच्या दूरवस्थेमुळे गर्भवती महिलेला खाटेवर बसवून नेण्याची वेळ

Update: 2020-09-28 11:01 GMT

रस्त्याची दूरवस्था झाल्याने एका गर्भवती महिलेला तब्बल १ किलोमीटरपर्यंत खाटेवर बसवून नेण्याची वेळ आली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खडकी गावात ही घटना घडलीय.

खडकी-हसनाबाद रस्त्याची दूरवस्था झाल्यानं गावापर्यंत अँम्ब्युलन्स जात नसल्यानं गावकरी आणि गर्भवती महिलेच्या नातेवाईकांना या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी खाटेचा वापर करावा लागला. एम्ब्युलन्स गावापर्यंत येऊ शकत नसल्याने एक किलोमीटर अंतरालर उभी होती. तिथपर्यंत या महिलेला खाटेवर बसवून नेण्यात आले.

वारंवार या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी करूनही रस्त्याचं काम होत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एखाद्या व्यक्तीला तातडीची वैद्यकीय गरज असेल तर काय सोय करायची, त्या व्यक्तीचा जीव गेला तर जबाबदार कोण असा सवालही गावकऱ्यांनी विचारला आहे.

Full View

 

Similar News