आता, योगी फॉर पीएम...

Update: 2018-12-13 06:18 GMT

५ राज्याच्या निवडणुकीनंतर आता उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी सुरु झाली आहे. 'उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना’ या संघटनेने लावलेल्या या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ जुमलेबाजी का नाम मोदी’ असं संबोधण्यात आलं आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'हिन्दुत्व का ब्रांड योगी’ असं संबोधण्यात आलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भुमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. मोदी हिंदुत्वाच्या भुमिकेवर कायम नसल्याचं या व्हिडीओमध्ये या व्यक्तीनं म्हटलं आहे. २०१४ मध्ये मोदींनी जी आश्वासन दिली होती त्या आश्वासना बाबत सदर व्यक्ती बोलत असून ही आश्वासन योगी पूर्ण करतील असा दावा व्हिडीओतील व्यक्ती करत आहे.

Similar News