देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत मुख्यमंत्री-नितीन गडकरी

Update: 2018-05-29 09:50 GMT

सेना-भाजप म्हणजे, तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशी सेना भाजपची स्थिती झाली असल्याची सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप-सेनेमधीलल वाद तात्पुरते असल्याचे म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पालघर निवडणुकीत भाजप आणि सेनेचे सबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याविषयी बोलताना गडकरी यांनी ‘मी पक्षाने सांगितलं तरच मध्यस्ती करेल’ असं सांगत भाजप आणि सेनेची युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली युती असल्याचे म्हटले आहे.

यावेळी गडकरींनी शिवसेनेसोबत युती राहायली हवी, असं मत व्यक्त करताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरही भाष्य केलं.

सुसंस्कृत मुख्यमंत्री

पालघरमधील प्रचारसभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जारी केली होती. या ऑडिओ क्लिपबाबत नितीन गडकरींना विचारण्यात आलं असता, त्यावर गडकरी म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना मी लहानपणापासून ओळखतो. ते असं कोणावर कधीही बोलणार नाहीत, तसा त्यांचा स्वभाव नाही. ते सुसंस्कृत आहेत. त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करा याचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो”

मुख्यमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंड भेदचा वापर करा असं म्हटले होते. तर सेनेने ही क्लिप अर्धवट दाखवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, उत्तर प्रदेशात हरल्यावर त्यात गडबड कशी?”

देशात झालेल्या पोटनिवडणुतील ईव्हीएम मशीनच्या गडबडीबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी “निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. मशीन बंद पडणे ही बाब निवडणूक आयोगाने गंभीर्याने घ्यायला हवी. मात्र पंजाबमध्ये काँग्रेस जिंकल्यावर ईव्हीएम योग्य, उत्तर प्रदेशात हरल्यावर त्यात गडबड कशी?” असा सवालही गडकरींनी यावेळी उपस्थित केला. तसंच ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काही गडबड वाटत असेल, तर त्याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं. अशी मागणी देखील गडकरी यांनी यावेळी केली.

पेट्रोल- डिझेलचे भाव वाढत असले तरी टमाटर, कांदा, बटाट्याचे भाव कमी

पेट्रोल-डिझेल भाववाढीवर बोलताना गडकरी यांनी, पेट्रोल- डिझेलचे भाव वाढत जरी असले करी टमाटर, कांदा, बटाट्याचे भाव कमी होत आहेत. असं म्हणत पेट्रोल डिझेल वाढीच्या प्रश्नाला गडकरी यांनी बगल दिली.

साम दाम दंड भेद, केंद्र सरकारच्या ४ वर्ष्ाची काम, मुख्यमंत्री सुसंस्कृत कसे आहेत, भाजपला सेनेची गरज आहे का? आणि पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती याबाबत गडकरी यांनी पत्रकारांना खास आपल्या शैलीत उत्तर दिली पाहा काय म्हणाले गडकरी….

Full View

Similar News