नितीन गडकरी होणार पंतप्रधान ?

Update: 2018-12-18 10:32 GMT

येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. परंतु यावर गडकरींना प्रश्न विचारला असता आपण स्वप्न पाहत नाही आणि या शर्यतीत ही नाही असे उत्तर त्यांनी दिले. जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना हे माहित आहे. ते आजतक या वृत्तवाहिनीवर बोलत होते. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील. आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मागच्या पाच वर्षात राहुल गांधींनी केलेल्या प्रगतीचे तुमच्यावर दडपण येते का ? आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींसमोर आव्हान आहे का ? असे विचारले असता गडकरी म्हणाले, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये तुलना होऊच शकत नाही. आम्ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नक्कीच विजय मिळवू असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.

Similar News