भाजपचा माढाचा उमेदवार ठरला ! ‘या’ उमेदवाराला मिळाली उमेदवारी

Update: 2019-03-29 10:34 GMT

गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असलेल्या माढा मतदार संघातून भाजपने आज आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या ठिकाणाहून निवडणूक लढवणार होते. मात्र, ऐन वेळेला पवार यांनी माघार घेतल्यानं हा मतदारसंघ चर्चेत आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले रणजित सिंह मोहिते पाटील यांना भाजप मैदानात उतरवणार अशी शक्यता होती. मात्र, भाजपने आज रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवार दिली आहे.

माढ्यात आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे. सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजितसिंह यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Similar News