आम्हाला तहान लागली, महानगरपालिका पाणी कधी देईल.

मुंबई महानगरपालिकेची निवडणुका आता जवळ येतेय, मुंबईच्या विकासासाठी नगरसेवक आपण निवडून देतो. पण निवडून आलेला नगरसेवक स्थानिक प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असेल, तर नेमकं स्थानिक नागरिकांनी जायचं कुठे? गेल्या ३५ वर्षांपासून मुंबईतील झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय महानगरपालिकेकडून अद्यापही केली नाही. शिवाय वीजेची तक्रार वेगळीच... सार्वजनिक शोचालयाच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडून कर्मचारी नाही. असे अनेक प्रश्न जे तुम्हा आम्हाला भेडसावतात पाहुयात जनतेच्या जाहीरनाम्यातून...

Update: 2022-09-03 15:08 GMT

मुंबईत अनेक झोपडपट्टी विभागात मुंबई महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येक घरोघरी नळाची सोय देखील केली जाते. परंतु 35 वर्षे होऊनी या झोपडपट्टीतील स्थानिक नागरिकांना पाणी पिण्याची सोय महानगरपालिकेकडून केली नाही.

तसेच महानगरपालिकेकडून सार्वजनिक लाईटीची व्यवस्था नाही. प्रत्येक महानगरपालिकेकडून सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी ठेवणं महानगरपालिकेचे काम आहे. महानगरपालिकेने या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केलं असेल तर संबंधित नगरसेवकांनी काही स्थायी सभागृहात प्रस्ताव मांडून नागरिकांच्या सुख सुविधा साठी विकास प्रकल्प राबवला पाहिजे. मुंबईतील बोरवली विभागातील नेहरूनगर या भागात अनेक वर्षांपासून नगरसेवक कोणतीच काम करत नाही असे स्थानिकांचा म्हणणं आहे.

नेहरूनगर झोपडपट्टी वसाहत मध्ये अकराशे होऊन अधिक लोक राहत आहेत.

परंतु या लोकांना महानगरपालिकेकडून पिण्याचे पाणी जरी मिळत नसेल तर त्यांनी स्वतंत्रपणे खाजगी पिण्याची टाकी बसवून तेथील 1100 हून अधिक स्थानिक लोकांना पिण्याचे पाणी कसे मिळेल याचे नियोजन केले आहे. त्यासाठी देखील हे लोक महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रशासनाच्या व्यवस्थेवर किंवा नगरसेवकावर अवलंबून न राहता स्वतःच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. महानगरपालिकेकडून सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी येथील स्थानिक लोकांनी खाजगी कर्मचारी ठेवून शौचालयाची साफसफाई केली जाते. त्यासाठी प्रत्येक घरातून पन्नास रुपये वर्गणी गोळा केली जाते.

वारंवार महानगरपालिकेला पाणीचे मागणी करून देखील. होणाऱ्या दुर्लक्षितपणामुळे अखेर या नागरिकांनी स्वतःचा मार्ग स्वतःच काढला. विशेष म्हणजे महानगरपालिका देखील या लोकांना खाजगी पाईपलाईन काढायला परवानगी देते पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही याचं मात्र नवलच आहे. आम्ही आर वार्ड मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जाऊन जलविभागात अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. या संबंधित त्यांच्याकडे विचारना केली असता, आमची आत्ताच ट्रान्सफर झाली आहे आम्हाला सहा महिने झाले आहेत त्यामुळे संबंधित प्रश्नांबद्दल काहीच माहिती नाही असे उत्तर जल विभागाचे अधिकारी निलेश ढगळे म्हणाले. तसेच तुमच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मी स्वतः या घटनेची पाहणी करेन. असे आश्वासन ऑफ द रेकॉर्ड माहिती दिली. त्यामुळे पाण्यासारखा गंभीर प्रश्नांवर मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आता तरी जागृत होतील का हे आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्येच समजेल.


Full View

Tags:    

Similar News