बेस्ट संप : पहारेकरी गप्प का?

Update: 2019-01-14 06:56 GMT

बेस्टचा संप सुरु असताना मुंबई महानगरपालिकेतील पहारेकरी शांत का आहेत? असा प्रश्न साहजिकच सर्वसामान्यांना पडला असेल. एरवी साध्या साध्या मुद्दयावरुन भाजपचे नेते शिवसेनेला कात्रीत पकडत असतात. मात्र, सध्या बेस्ट बंद असताना स्वत:ला पहारेकरी म्हणणारे तोंडावर बोट ठेवून गप्प का? याचं उत्तर आहे. आगामी २०१९ च्या निवडणुकीची जुळवाजुळव…

सध्या पडद्यामागे खूप साऱ्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे पहारेकरी शांत असल्याचं बोललं जात आहे. स्वतंत्र लढण्याच्या वल्गना करणारी सेना पडद्यामागे काही अटींवर आपली एकटे लढण्यासाठी उपसलेली तलवार म्यान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेची गणित जुळवण्यासाठी गुंतलेले दोनही सत्ताधारी सध्या सत्ता मिळवण्यासाठी वाटाघाटी करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे संपाचा आजचा ७ वा दिवस असताना देखील भाजप शांत आहे. लोकसभा जागा वाटपबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत भाजपने शांत राहण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान या सर्वामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असताना दोनही सत्ताधारी गेल्या सात दिवसांपासून या संपावर तोडगा काढू शकलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये शिवसेना आणि भाजपबद्दल तीव्र संतोष व्यक्त केला जात आहे.

Similar News